ऑनलाईन टीम / चंदीगड :
पंजाबमध्ये मागील 24 तासात 289 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे पंजाबमधील कोरोना बाधितांची एकूण संख्या 1 लाख 63 हजार 665 इतका झाला आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत एकूण 1,63,665 रुग्णांपैकी 1 लाख 53 हजार 382 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 5 हजार 230 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
ताज्या आकडेवारी नुसार, पंजाबमध्ये आतापर्यंत जवळपास 37 लाख 12 हजार 608 टेस्ट करण्यात आल्या आहेत. सद्य स्थितीत 5 हजार 053 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातील 133 रुग्णांना अक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. तर 08 जण व्हेंटिलेटरवर आहेत.