ऑनलाईन टीम / चंदीगढ :
पंजाब एकता पक्षाचे प्रमुख आणि आमदार सुखपालसिंह खैरा यांच्या चंदीगढमधील सेक्टर पाच येथील निवासस्थानी अंमलबजावणी संचालनालयाने मंगळवारी सकाळी छापा टाकला.
मनी लाँडरिंगच्या आरोपाखाली ही छापेमारी करण्यात आली असून, ईडीचे एक पथक खैरा यांच्या भुलत्थ येथील निवासस्थानीही पोहचले आहे. त्याठिकाणी ईडीची कारवाई सुरू आहे.
खैरा हे सन 2017 मध्ये भुलत्थ येेथून आम आदमी पक्षाच्या तिकिटावर आमदार झाले होते. मात्र, त्यानंतर त्यांनी ‘आप’चा राजीनामा देत पंजाब एकता पक्षाची स्थापना केली.