ऑनलाईन टीम / चंदीगड :
कोरोनाबरोबर अधिक प्रबळपणे लढण्यासाठी पंजाब मंत्रिमंडळाने मंगळवारी आरोग्य विभागातील रिक्त 3954 नियमित पदे आणि चिकित्सा शिक्षा आणि संशोधन विभागात 291 पदे भरण्याची परवानगी दिली आहे.
एका प्रवक्त्यांनी सांगितले की मुख्यमंत्री कार्यालयात मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
ते म्हणाले या बैठकीत असा निर्णय घेतला गेला की, आरोग्य विभागात 3954 पदांपैकी 2966 पदे पहिल्या टप्प्यात भरली जातील. तर दुसऱ्या टप्प्यात सप्टेंबर 2020 मध्ये जी पदे रिक्त होणार आहेत त्यांच्या जागी बाकी 988 पदे भरली जातील.
मंत्रिमंडळाने डॉ. के के तलवार यांच्या नेतृत्वात विशेष निवड कमिटीकडून वॉक इन इंटरव्यू द्वारे मेडिकल ऑफिसरांची भरती देखील सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.
अशा प्रकारे डॉक्टर, पैरा मेडिकल आणि अन्य स्टाफ ची भरती पंजाब लोक सेवा आयोग आणि पंजाब अधिनस्त सेवा निवड बोर्डाकडून काढून घेण्यात आली असून बाबा फरीद युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स फरीदाकोट द्वारे करण्याची परवानगी दिली आहे.