काकीनाडा (आंध्रप्रदेश
हॉकी इंडियाच्या येथे सुरू असलेल्या 12 व्या कनिष्ठ महिलांच्या राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत तिसऱया दिवशी पंजाब, उत्तरप्रदेश, मिझोराम, कर्नाटक आणि बंगाल या संघांनी आपले विजय नोंदविले.
फ गटातील झालेल्या पहिल्या सामन्यात हॉकी पंजाबने छत्तीसगड हॉकी संघाचा 6-0 असा पराभव केला. पंजाब संघातर्फे चेवाँग तेमांगने शानदार हॅट्ट्रीक, करमनप्रित कौरने दोन गोल तर वैशाली शर्माने 1 गोल केला. दुसऱया एका ग गटातील सामन्यात उत्तरप्रदेश हॉकी संघाने हॉकी बिहार संघाचा 9-0 असा एकतर्फी पराभव केला. ग गटातील अन्य एका सामन्यात हॉकी मिझोरामने हॉकी राजस्थानवर 3-2 अशा गोलफरकाने निसटता विजय मिळविला. च गटातील सामन्यात हॉकी कर्नाटकाने हॉकी आंध्रप्रदेशचा 3-2 असा पराभव केला. कर्नाटक संघातर्फे कावेरी, जिविता आणि देचम्मा गणपती यांनी प्रत्येकी एक गोल केला. च गटातील अन्य एका सामन्यात हॉकी बंगालने हॉकी गुजरातचा 4-3 अशा गोलफरकाने पराभव केला.