- आतापर्यंत 5 लाख 651 रुग्ण कोरोनामुक्त!
ऑनलाईन टीम / चंदीगड :
पंजाबमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असतानाच एक दिलासादायक बाब समोर आली आहे. मागील 24 तासात 3,724 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर कालच्या दिवशी 6,797 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, पंजाबमधील कोरोना बाधितांची एकूण संख्या 5 लाख 59 हजार 759 पोहोचली असून त्यातील 5 लाख 00 हजार 651 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. कालच्या दिवशी 148 जणांनी आपला जीव गमावला आहे, तर आतापर्यंत 14 हजार 180 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. वाढती मृत्यू संख्या ही भीतीदायक आहे.
ताज्या आकडेवारी नुसार, पंजाबमध्ये आतापर्यंत जवळपास 90 लाख 74 हजार 280 नमुने घेण्यात आले आहेत. यातील 72,812 नमुने काल एका दिवसात घेतले गेले. सद्य स्थितीत 44 हजार 964 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातील 5,302 रुग्णांना अक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. तर 369 जण व्हेंटिलेटरवर आहेत.