ऑनलाईन टीम / चंदीगड :
पंजाबमध्ये मागील 24 तासात 325 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 12 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे पंजाबमधील कोरोना बाधितांची एकूण संख्या 1 लाख 33 हजार 975 इतका झाला आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंतच्या एकूण 1,33,975 रुग्णांपैकी 1 लाख 25 हजार 566 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 4 हजार 195 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
- 4,195 रुग्णांवर उपचार सुरू
ताज्या आकडेवारी नुसार, पंजाबमध्ये आतापर्यंत जवळपास 26 लाख 20 हजार 786 टेस्ट करण्यात आल्या आहेत. सद्य स्थितीत 4 हजार 195 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातील 99 रुग्णांना अक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. तर 16 जण व्हेंटिलेटरवर आहेत.
- शहर कोरोनामुक्त रुग्ण संख्या
- लुधियाना 19,181
- जालंधर 14,117
- सास नगर 11,647
- अमृतसर 11,140