ऑनलाईन टीम / चंदीगड :
पंजाबमध्ये मागील 24 तासात 269 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 13 जणांनी आपला जीव गमावला. त्यामुळे पंजाबमधील कोरोना बाधितांची एकूण संख्या 1 लाख 65 हजार 668 इतका झाला आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, काल एका दिवसात 450 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर आतापर्यंत 1,65,668 रुग्णांपैकी 1 लाख 56 हजार 342 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 5 हजार 312 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
ताज्या आकडेवारी नुसार, पंजाबमध्ये आतापर्यंत जवळपास 38 लाख 32 हजार 411 टेस्ट करण्यात आल्या आहेत. सद्य स्थितीत 4 हजार ,014 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातील 77 रुग्णांना अक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. तर 15 जण व्हेंटिलेटरवर आहेत.