- 2,669 नवीन बाधित; 44 मृत्यू
ऑनलाईन टीम / चंदीगड :
पंजाबमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसत आहे. मागील 24 तासात 2,669 नव्या रुग्णांची नोंद झाली. 44 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे पंजाबमधील कोरोना बाधितांची एकूण संख्या 2 लाख 13 हजार 110 इतका झाला आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, कालच्या दिवसात 1,331 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. तर आतापर्यंत 2,13,110 रुग्णांपैकी 1 लाख 88 हजार 529 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 6 हजार 324 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
ताज्या आकडेवारी नुसार, पंजाबमध्ये काल 36,956 जणांचे नमुने तपासणीसाठी घेतले. तर आतापर्यंत जवळपास 56 लाख 03 हजार 286 जणांचे नमुने घेण्यात आले आहेत. सद्य स्थितीत 18 हजार 257 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातील 272 रुग्णांना अक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. तर 23 जण व्हेंटिलेटरवर आहेत.