देशाचा पहिला हॅप्पीनेस इंडेक्स सादर : मध्यप्रदेश-छत्तीसगड यादीत तळालास्थळाची उभारणी होणार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
देशाच्या पहिल्या हॅप्पीनेस इंडेक्सनुसार मिझोरम, पंजाब आणि अंदमान-निकोबार सर्वात आनंदी राज्ये आहेत. मोठय़ा राज्यांमध्ये पंजाब, गुजरात आणि तेलंगणा अव्वल आहे. तर छोटय़ा राज्यांमध्ये मिझोरम, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश आघाडीवर आहेत. खराब कामगिरी करणाऱया 10 राज्यांमध्ये जम्मू-काश्मीर, मध्यप्रदेश, तामिळनाडू, राजस्थान, गोवा, मेघालय, ओडिशा, उत्तराखंड आणि छत्तीसगड सामील आहे.
हॅप्पीनेस इंडेक्ससाठी आयआयएम आणि आयआयटीत प्राध्यापक राहिलेले राजे पिलानिया यांच्या नेतृत्वाखाली मार्च 2020 ते जुलै 2020 दरम्यान अध्ययन करण्यात आले आहे. यात देशभरातील 16,950 लोकांनी भाग घेतला आहे. वैवाहिक स्थिती, वयोगट, शिक्षण आणि कमाईचा सकारात्मक स्वरुपात आनंदीवृत्तीशी थेट संबंध असल्याचे या अध्ययातून दिसून येते.
विवाहित अधिक आनंदी
अविवाहित लोकांच्या तुलनेत विवाहित लोक अधिक आनंदी असतात. कोरोना संकटाचा लोकांच्या आनंदीपणावर कोणता प्रभाव पडला हे देखील या अध्ययनात पाहण्यात आले आहे. पैशाऐवजी वेळेला अधिक महत्त्व देणारे अधिक आनंदी असतात. महाराष्ट्र, दिल्ली आणि हरियाणाच्या लोकांच्या आनंदावर कोरोनाने सर्वाधिक प्रभाव टाकला आहे.
लोक आशावादी
पुड्डुचेरी आणि जम्मू-काश्मीरच्या लोकांवर कोरोनाचा प्रभाव दिसून आलेला नाही. तर मणिपूर, अंदमान आणि निकोबार तसेच लक्षद्वीपचे लोक या काळात आशावादी राहिले आहेत. दयाळू आणि धैर्यवान लोक अधिक समृद्ध आणि आनंदी असतात असे स्टॅनफोर्डमधील सायन्स डायरेक्टर डॉ. इम्मा सेप्पाला यांनी म्हटले आहे.
मणिपूरची आघाडी
अध्ययनानुसार देशाचे लोक भविष्यासंबंधी आशावादी आहेत. तसेच पुढील 5 वर्षांमध्ये सद्यसिथतीच्या तुलनेत अधिक आनंदी आणि समृद्ध होऊ मानत आहेत. भविष्यातील हॅप्पीनेस इंडेक्समध्ये मणिपूर, अंदमान-निकोबार आणि गुजरात सर्वाधिक आनंदी राज्ये आहेत. मोठय़ा राज्यांमध्ये गुजरात, उत्तराखंड आणि आंध्रप्रदेशत आघाडीवर आहेत.