वार्ताहर / सांबरा
मुतगे येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या सभागृहात पंजाब नॅशनल बँकेतर्फे दत्तक ग्राम योजनेंतर्गत देणगी स्वरुपात दिलेल्या वस्तूंचे वितरण करण्यात आले. अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष आर. वाय. पाटील होते.
कार्यक्रमाची सुरुवात इशस्तवनाने व स्वागतगीताने झाली. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या फोटोचे पूजन पंजाब नॅशनल बँकेचे वरिष्ठ प्रबंधक वैभव चिकटे आणि आर. वाय. पाटील यांच्या हस्ते झाले.
प्रारंभी प्रास्ताविक ग्रा. पं. अध्यक्ष भालचंद्र पाटील यांनी केले. तर मान्यवरांचे स्वागत मुख्याध्यापक एम. वाय. केदार यांनी केले.
वैभव चिकटे यांनी बँकेच्यावतीने सुरू केलेल्या वेगवेगळय़ा सेवासुविधा त्याचबरोबर विद्यार्थी, नोकरदार, शेतकरी, व्यावसायिक यांच्यासाठी सुरू करण्यात आलेल्या सेवा याचा आढावा घेतला व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय भाषणात आर. वाय. पाटील म्हणाले, पंजाब नॅशनल बँकेने सुरू केलेला हा उपक्रम चांगला असून याचा खरोखरच गावासाठी लाभ होणार असल्याचे सांगून बँकेच्या ऑनलाईन सेवा आणि विविध उपक्रम या संदर्भात उपस्थितांना मार्गदर्शन केले.
याप्रसंगी बँकेच्या मुख्य प्रबंधक सत्यभामा, कृषी प्रबंधक विशाल मोरे, ग्रा. पं. उपाध्यक्षा रुक्मिणी शिंगारी, सदस्य, शाळा सुधारणा समितीचे सदस्य, मुतगा प्राथमिक कन्नड शाळा, प्राथमिक मराठी शाळा, न्यू इंग्लिश प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, पालकवर्ग उपस्थित होते. सूत्रसंचालन टी. डी. कुराडे यांनी केले. व्ही. व्ही. खामकर यांनी आभार मानले.