- आजपासून दोन शहरात नाईट कर्फ्यू
ऑनलाईन टीम / चंदीगड :
पंजाबमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने पसरत आहे. वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पटियाला आणि लुधियाना जिल्हा प्रशासनाने देखील शुक्रवारी रात्रीपासून कर्फ्यूची घोषणा केली आहे. हा कर्फ्यू रात्री 11 ते सकाळी 5 या वेळेत चालू असणार आहे.
दरम्यान, मुक्तसरचे माजी आमदार आणि एसपीजीसीचे सदस्य सुदर्शन सिंह मराड यांच्यासह सुबे मधील 1310 लोकांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तर 18 जणांनी आपला जीव गमावला आहे. तर आतापर्यंत 5,956 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे वित्त मंत्री मनप्रीत सिंह बादल यांना देखील कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यापूर्वी बादल यांनी 8 मार्च रोजी पंजाबचा अर्थसंकल्प सादर केला होता.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन प्रशासनाने रात्री 11 ते सकाळी 5 या वेळेत नाईट कर्फ्यूची घोषणा केली आहे. हा कर्फ्यू जालंधर, एसबीएस नगर, होशियारपुर आणि कपूरथला या जिल्ह्यात याआधी पासूनच कर्फ्यू लावण्यात आला आहे.