ऑनलाईन टीम / चंदीगड :
पंजाबमध्ये मागील 24 तासात 581 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 27 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे पंजाबमधील कोरोना बाधितांची एकूण संख्या 1 लाख 24 हजार 535 इतका झाला आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, पंजाबमधील एकूण 1,24,535 रुग्णांपैकी 1 लाख 12 हजार 417 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 3 हजार 860 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
ताज्या आकडेवारी नुसार, पंजाबमध्ये आतापर्यंत जवळपास 21 लाख 67 हजार 731 टेस्ट करण्यात आल्या आहेत. सद्य स्थितीत 8 हजार 258 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातील 202 रुग्णांना अक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. तर 32 जण व्हेंटिलेटरवर आहेत.