ऑनलाईन टीम/तरुण प्रतिनिधी
पंजाब निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंजाबचे मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांचे पुतणे भूपिंदर सिंग आणि त्यांचे सहकारी संदीप कुमार यांच्या निवासस्थानाच्या झडतीदरम्यान, काही मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे आणि 6 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे भारतीय चलन जप्त करण्यात आले. सिंग यांच्या घरी सुमारे 4 कोटी आणि कुमार यांच्या घरी 2 कोटी सापडल्याचे सूत्रांनी सांगितले. मोहालीतील अवैध वाळू उत्खनन प्रकरणातील मुख्य आरोपी भूपिंदरसिंग हनी याच्या परिसरात अंमलबजावणी संचालनालयाने झडती घेतली. अंमलबजावणी संचालनालयाने सुरू असलेल्या छाप्यांमध्ये भूपिंदरसिंग हनीच्या निवासास्थानातून 3.9 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम मिळाली आहे. या छाप्यांमधून आतापर्यंत सुमारे 10.7 कोटी रुपये जप्त करण्यात आल्याचे ईडीच्या अधिकाऱ्याने सांगितले.