ऑनलाईन टीम / चंदीगढ :
पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी शिरोमणी अकाली दलाला बहुजन समाज पार्टी हा नवा साथीदार मिळाला आहे. शिअद मुख्यालयातील आज झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर अकाली दलाचे प्रमुख सुखबीर बादल यांनी शिअद-बसपा युतीची अधिकृत घोषणा केली.
सप्टेंबर 2020 मध्ये केंद्रीय कृषी कायद्यांवरून सुरू झालेल्या शेतकरी आंदोलनामुळे शिअदने भाजपासोबतची युती तोडली. त्यानंतर शिअद दुसऱ्या पक्षाशी राजकीय युती करण्याचा विचार करत होती. गेल्या काही दिवसांपासून युतीबाबत शिअद आणि बसपा नेत्यांमध्ये बैठकांची फेरी सुरू होती. आज शिअद आणि बसपा यांच्यातील युतीवर बसपाचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि राज्यसभेचे खासदार सतीशचंद्र मिश्रा यांनी अंतिम शिक्कामोर्तब केले.
पंजाबमध्ये जवळपास 34 टक्के दलितांकडे व्होट बँक आहेत आणि शिअदप्रमुख सुखबीरसिंग बादल यांनी निवडणुका जिंकल्यानंतर दलित समाजातून उपमुख्यमंत्री करण्याची घोषणा केली आहे.