ऑनलाईन टीम / चंदीगड :
पंजाबमध्ये मागील 24 तासात 802 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 31 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे पंजाबमधील कोरोना बाधितांची एकूण संख्या 1 लाख 43 हजार 395 इतका झाला आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, काल 651 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. तर आतापर्यंतच्या एकूण 1,43,395 रुग्णांपैकी 1 लाख 32 हजार 917 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 4 हजार 541 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
ताज्या आकडेवारी नुसार, पंजाबमध्ये आतापर्यंत जवळपास 29 लाख 22 हजार 722 टेस्ट करण्यात आल्या आहेत. सद्य स्थितीत 5 हजार 937 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातील 144 रुग्णांना अक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. तर 17 जण व्हेंटिलेटरवर आहेत.