ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांची आज 133 वी जयंती. नेहरूंचा जन्मदिवस देशभरात बालदिन म्हणून साजरा केला जातो. नेहरूंच्या या जयंती निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे.
आजची मुले उद्याचा भारत निर्माण करणार आहेत. ज्या पद्धतीने आपण त्यांना घडवू त्याप्रमाणे देशाचे भविष्य ठरेल. लहान मुले हीच देशाची खरी ताकद असल्याचे मोदी नेहरू मानत होते. लहान मुलांवर त्यांचे असलेले प्रेम यामुळेच त्यांच्या जन्मदिनी बालदिन साजरा केला जातो.