चिपळूण कांग्रेसच्यातीने पोलिसांत तक्रार
प्रतिनिधी/ चिपळूण
देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस देशभर बालदिन म्हणून साजरा होत असताना सुनील बक्षी नामक व्यक्तीने नेहरूंबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित केल्याने संतापाची लाट उसळली आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला तातडीने अटक करावी, अशी मागणी चिपळूण तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत यादव यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी येथील पोलिसांत केली आहे.
यासंदर्भात येथील पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे यांची तालुकाध्यक्ष यादव यांच्यासह कॉंग्रेसच्या पदाधिकाऱयांनी सोमवारी भेट घेत दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे की, सुनील बक्षी या व्यक्तीने पंडित नेहरूंबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह लिखाण करून ते सार्वजनिक केल्यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे या माथेफिरूवर तातडीने कडक कारवाई करावी. शिवाय कारवाई न झाल्यास चिपळूण तालुका काँग्रेसतर्फे तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा देतानाच बक्षी याने केलेली पोस्ट, लिंक आणि त्याच्या फेसबुक अकाऊंटची माहितीही पोलिसांना देण्यात आली. दरम्यान्। पोलिसांनी संबंधित व्यक्तीचा शोध घेऊन कारवाई करण्याचे आश्वासन यादव यांना दिले आहे. यावेळी नगरसेवक करामत मिठागरी, माजी उपनगराध्यक्ष व शहराध्यक्ष लियाकत शाह, काँग्रेसचे प्रवक्ते वासुदेव मेस्त्राr, जिल्हा कार्यकारिणी सदस्य गुलजार कुरवले, सेवादलचे तालुकाध्यक्ष इम्तियाज कडू, युवक काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष रुपेश आवले आदी उपस्थित होते.