प्रतिनिधी / पंढरपूर
हवामान बदलामुळे पंढरपूरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. उपजिल्हा रुग्णालयातील 21, तहसील येथील कारागृहातील 17 आरोपी तर पंढरपूर शहर पोलिस ठाण्यातील 19 पोलिस कर्मचारी अशा एकुण 57 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. कोरोनाबाधितांवर उपजिल्हा रुग्णालय व कोविड सेंटर येथे उपचर सुरू आहेत.
कोरोना रोगाचा संसर्ग राज्यभरात झपाटयाने वाढत आहे. ओमिक्रॉनच्या नव्या व्हेरीएंटचा वाढता धोका लक्षात घेता पंढरपूरातील आरोग्य यंञणा सतर्क झाली होती. रुग्णांना आरोग्यसेवा देणार्या उपजिल्हा रुग्णालयातील, डॉक्टर , सुरक्षा रक्षक, फार्मसी ऑफीसर, शिपाई अशा एकुण 21 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तहसिल कार्यालय येथे असणार्या कारागृहातील 17 कैद्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर पंढरपूर शहर पोलिस ठाण्यातील 19 पोलिस कर्मचार्यांना कोरोनाची बाधा झालेली आहे.
उपजिल्हा रुग्णालयात दररोज 300 ते 350 च्या आसपास रुग्णांची आरोग्य तपासणी होते. तर उपजिल्हा रुग्णालयात 64 आजारी व प्रसुतीसाठी आलेले रुग्ण उपचरार्थ दाखल आहेत. त्यामुळे उपचार करणारे, डॉक्टर नर्स कोरोनाबाधित आढळल्याने कोरेानाबाधित रुग्ण वाढण्याची शक्यता आहे. तर पोलिस कर्मचारी यांचा येणारा लोकांशी संपर्क तर कैद्यांना जेवण पुरविणारे व पोलिस कर्मचारी यांचा कोरोनाबाधितांशी संपर्क झालेला आहे. वाढती रुग्णसंख्या आटोक्यात ठेवण्यासाठी आरोग्य यंञणा प्रयत्नशिल आहे.
पंढरपूरात 30 टक्के पॉझिटिव्ह रेट
कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. 100 रुग्ण तपासल्यानंतर सरासरी 25 ते 30 कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह सापडत आहेत. लसीचे दोन डोस झालेल्यांना कोरोनाची लक्षणे कमी प्रमाणात जाणवत आहेत. त्यामुळे नागरिकांनी कोरोना लसीकरण करुन घ्यावे. मास्क, लसीकरण, सोशल डिस्टंन्सिंग या नियमांचा वापर करावा. – डॉ. एकनाथ बोधले. तालुका आरोग्य अधिकारी,पंढरपूर.