2 लाखांचा ऐवज पळविला : मारिहाळ पोलीस स्थानकात एफआयआर
प्रतिनिधी/ बेळगाव
पंतनगर (व्हन्याळ एक्स्टेंशन) येथील एका माजी सैनिकाच्या घरात चोरीचा प्रकार घडला आहे. पाठीमागील दरवाजा फोडून भरदिवसा चोरटय़ांनी सुमारे 2 लाखांचे दागिने पळविले आहेत. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.
यासंबंधी मल्लाप्पा बसप्रभू मंगोजी यांनी मारिहाळ पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. मंगळवारी सायंकाळी चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. घटनेची माहिती मिळताच गुन्हे तपास विभागाचे एसीपी चंद्रशेखर निलगार, मारिहाळचे पोलीस निरीक्षक बी. एस. मंटूर व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
मल्लाप्पा हे निवृत्त सैनिक आहेत. सध्या अंदमान येथील डिफेन्स सेक्मयुरिटी कोर्समध्ये सेवा बजावतात. सुटीवर ते आपल्या गावी आले आहेत. मंगळवारी सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास घराला कुलूप लावून ते शिगीहळ्ळीला गेले होते. सायंकाळी 7.25 वाजण्याच्या सुमारास घरी परतले. त्यावेळी चोरीचा प्रकार उघडकीस आला.
सकाळी 11.30 ते सायंकाळी 7.25 या वेळेत चोरीचा हा प्रकार घडला आहे. चोरटय़ांनी भरदिवसा बंद घराचा पाठीमागील दरवाजा फोडून 38 गॅम सोन्याचे दागिने, 20 हजार रुपये रोख रक्कम असा सुमारे 2 लाखांचा ऐवज लांबविला आहे. बेळगाव शहर व उपनगरांत गुन्हेगारी टोळय़ा पुन्हा सक्रिय झाल्या आहेत. पोलीस दलासमोर या गुन्हेगारांनी तपासाचे आव्हान उभे केले आहे.