प्रतिनिधी /पणजी
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शनिवार दि. 18 रोजी व्हर्च्युअल पद्धतीने गोमंतकीयांशी संवाद साधणार आहेत. सकाळी 10.30 वाजता कोविड लस लाभार्थींमध्ये समाविष्ट असलेल्या आरोग्य सेवा कर्मचाऱयांशी ऑनलाइन संवाद साधतील.
पंतप्रधानांचा ऑनलाईन संवाद गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या मुख्य व्याख्यान सभागृह, रवींद्र भवन, मडगांव, सांगे पालिका सभागृह, राजीव कला मंदिर, फोंडा, म्युनिसिपल सभागृह सांखळी, जुने अझिलो हॉस्पिटल सभागृह म्हापसा येथे थेट दाखविला जाईल.
ग्रामपंचायती, पालिकांमध्येही प्रक्षेपण राज्यातील सर्व ग्रामपंचायती आणि नगरपालिकांमध्ये परस्पर संवाद थेट दाखविला जाईल. सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडून आलेल्या प्रतिनिधींना त्यांच्या वॉर्डातील नागरिकांसह आपापल्या स्थानिक संस्थेच्या सार्वजनिक सक्रिनिंगला उपस्थित राहण्याची विनंती करण्यात आली आहे. राज्यभरातील सर्व प्राथमिक, शहरी आणि सामाजिक आरोग्य केंद्रांवरही हा कार्यक्रम दाखविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सामान्य जनतेला सदर कार्यक्रमास उपस्थित राहण्याची विनंती करण्यात आली आहे.