ऑनलाईन टीम / इस्लामाबाद :
पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे इस्लामाबादेतील शासकीय निवासस्थान आता भाड्याने देण्यात येणार आहे. पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी नुकतीच यासंदर्भात घोषणा केली आहे.
पाकिस्तानातील समा टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, इस्लामाबादेतील पंतप्रधानांच्या शासकीय निवासस्थानाच्या देखभालीचा खर्च 4 कोटी 70 लाख रूपये होता. त्यामुळे इम्रान खान यांनी निवासस्थान रिकामं केले होते. ऑगस्ट 2019 मध्ये हे निवासस्थान एका विद्यापीठात बदलण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, आता या योजनेत बदल करण्यात आला आहे. रेड झोनमध्ये असलेले हे निवासस्थान आता सांस्कृतिक कार्यक्रम, फॅशन शो, शैक्षणिक आणि अन्य कार्यक्रमांसाठी भाड्याने देण्यात येणार आहे. या निवासस्थानापासून उत्पन्न कसे मिळवता येईल, याचा विचार इम्रान सरकार करत आहे.