राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे वाढत्या गॅस दरवाढीचा निषेधार्थ आंदोलन
प्रतिनिधी/ सातारा
घरगुती गॅसचे दरवाढ केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने पोस्टाने रजिस्टर करुन शेण्याच्या गोवऱया चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शनिवारी पाठवण्यात आल्या. सातारा पोस्ट कार्यालयाबाहेर पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या विरोधाच्या घोषणा देण्यात आल्या.
राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षा संमिद्राताई जाधव, संपर्कप्रमुख कुसूमताई भोसले, उपाध्यक्ष नलिनी जाधव, कोरेगाव विधानसभा अध्यक्ष संजना जगदाळे, उषाताई पाटील, रशीदा शेख, जावली तालुकाध्यक्षा रुपाली भिसे, शुभांगी निकम, सुवर्णा वाईकर, सुरेखा निवडुंगे, छाया खरात आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांनी जिल्हाधिकाऱयांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, केंद्र सरकारच्या आडमुठेपणामुळे दिवसेंदिवस होणाऱया गॅस दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. केंद्र सरकारच्या विरोधात भयकंर असंतोष आहे. घरगुती गॅसच्या किमतीत मोठी वाढ झाली. केंद्र शासनाचे गणित सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेरचे आहे. त्यांना ही दरवाढ जीव नकोसा करणारी आहे. त्यामुळे हे पाऊल उचलावे लागत आहे. केंद्र सरकारने सामान्य जनतेच्या सामान्य अपेक्षाही पूर्ण करु शकत नाही. वारंवार होणाऱया घरगुती वापराच्या गॅसच्या किमीत वाढीवर सरकारचे बिलकुल नियंत्रण नाही. त्यामुळे सातारा जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसकडून पंतप्रधानांना शेणाच्या गोवऱया पाठून निषेध करत आहोत. चुकीचे अच्छे दिन आणल्याबद्दल मोदी सरकारचे अभिनंदन असे म्हटले आहे.