ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाला लाजपत राय यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले, महान स्वातंत्र्यसैनिक पंजाब केसरी लाला लाजपत राय यांना त्यांच्या जन्म-जयंती दिनी कोटि-कोटि प्रणाम.
महान नेते लाला लाजपत राय यांचे त्यांच्या जयंतीनिमित्त स्मरण करतो. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांचे अमिट योगदान राहिले आहे. त्यांनी अनेक पिढ्यांमधील लोकांना प्रेरणा दिली आहे.