भेटीसाठी मागितला वेळ : राज्याशी निगडित मुद्यांवर करणार चर्चा
वृत्तसंस्था / चंदीगड
पंजाबचे नुतन मुख्यमंत्री भगवंत मान लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटणार आहेत. या भेटीसाठी मान यांनी वेळ मागितला आहे. मुख्यमंत्री मान यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यावर औपचारिक भेटीसाठी पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांकडून वेळ मागितला आहे. या भेटीप्रसंगी पंजाबशी निगडित मुद्यांवर दोघांशी चर्चा करणार असल्याचे मान म्हणाले.
भगवंत मान यांनी 16 मार्च रोजी खटकडकलांमध्ये मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी ट्विटद्वारे भगवंत मान यांचे अभिनंदन पेले होते. पंजाबचा विकास आणि लोकांच्या कल्याणासाठी मिळून काम करू असे पंतप्रधानांनी नमूद पेले होते.
सीमा सुरक्षा मुद्दा महत्त्वाचा
पंजाब आणि केंद्र सरकार यांच्यात सीमा सुरक्षा हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. पंजाबमध्ये सीमेपलिकडून पाकिस्तानमधून ड्रोनद्वारे येणारे अमली पदार्थ आणि शस्त्रास्त्रs रोखण्याचे आव्हान आहे. सीमेच्या सुरक्षेची जबाबदारी बीएसएफची असली तरीही पंजाब पोलिसांकडून सहकार्य केले जाते. याचमुळे केंद्र आणि राज्यादरम्यान ताळमेळ असणे अत्यंत आवश्यक आहे.