ऑनलाईन टीम / मुंबई :
कोरोना चा फैलाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील लॉक डाऊन चा कालावधी तीन मे पर्यंत वाढवण्यात येत आहे अशी घोषणा आज केली. यावेळी ते म्हणाले, कोरोनाला रोखण्यात अजून यश आले नाही आहे. त्यामुळे देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला आहे.
या निर्णयाचे सर्व स्तरावरुन स्वागत केले जात आहे. या निर्णयाचे समर्थन भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैना यांने देखील केले आहे. याबाबत आपल्या भावना सुरेश रैना यांने ट्विट करत व्यक्त केले आहेत.
रैना आपल्या ट्विटमध्ये म्हणाला की, चला, कोरोना विरोधातील लढा आपण सर्वांनी मिळून जिंकूया. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लॉक डाऊन चा कालावधी तीन मे पर्यंत वाढवला जात असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आत्ता आपण तीन मे पर्यंत घरात राहून साऱ्यांना सुरक्षित ठेवूया.
तसेच आरोग्य ॲप देखील डाउनलोड करूया. ह्या ॲप्स आपल्या सर्वांना नक्कीच फायदा होईल आणि आपण सुरक्षित ही राहू, असे रैना याने म्हटले आहे.