नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी दिल्लीतील रकाबगंज येथील गुरुद्वाराला भेट दिली. गुरुद्वारात जाऊन त्यांनी शीख समुदायाचे नववे गुरु तेग बहादूर यांना नमन केले. गुरु तेग बहादूर यांच्या सर्वोच्च बलिदानासाठी त्यांना श्रद्धांजली वाहिली. मोदींचा हा गुरुद्वाराचा दौरा अचानक ठरल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे मंदिर व्यवस्थापनालाही यासंदर्भात काहीही कल्पना नसल्यामुळे प्रशासकीय यंत्रणेची धावपळ उडाली. दरम्यान, मोदींनी गुरुद्वाराला भेट दिल्याने विरोधकांकडून टीकाही करण्यात येत आहे शेतकरी आंदोलन सुरू असताना हा दौरा म्हणजे डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न असल्याची टीका विरोधकांनी केली आहे.