ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक आणि सामाजिक परिषद सत्राला संबोधित करणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने याबाबतची माहिती दिली आहे.
आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक आणि सामाजिक परिषद सत्रात मोदींसोबत नॉर्वेचे पंतप्रधान आणि संयुक्त राष्ट्र संघटनेचे सरचिटणीस सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस उपस्थित राहणार आहेत. यावर्षीच्या सत्रात सरकारी, खाजगी क्षेत्र, नागरी संस्था आणि शैक्षणिक यासह विविध गटातील उच्च स्तरीय प्रतिनिधींचा समावेश असणार आहे.
या सत्रात संयुक्त राष्ट्र अधिक बळकट कसे करता येईल, आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडी आणि कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव यावर चर्चा होणार आहे.