पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी 6 वाजता देशवासियांना संबोधित करणार आहेत. स्वत: मोदींनी ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली आहे.
देशातील कोरोनाची सद्यस्थिती आणि आगामी सणासुदीच्या काळाबद्दल मोदी बोलू शकतात. सणासुदीच्या काळात देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो, त्यादृष्टीने सोशल डिस्टन्स आणि मास्कचे वापर करण्याचे नागरिकांना आवाहन करू शकतात.
लॉकडाऊन काळात ढासळलेल्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी मोदी कोणत्या नवीन पॅकेजची घोषणा करतील का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.