ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात सध्या लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरू असून, कोरोनाचा प्रादुर्भावही दिवसेंदिवस वाढत आहे. लॉकडाऊनच्या याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या दुपारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत. पीएमओ कार्यालयाने ट्विटद्वारे याबाबतची माहिती दिली आहे.
उद्या (सोमवार) दुपारी तीन वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व मुख्यमंत्र्यांशी संवाद साधतील. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्या होणारी ही 5 वी बैठक आहे. या बैठकीत लॉकडाऊन संदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीनंतर देशातील लॉकडाऊन वाढणार की हटणार याकडे देशवासियांचे लक्ष लागून राहिले आहे.