ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोना लसीकरण मोहिमेसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी 4 वाजता देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत ऑनलाईन बैठक घेणार आहेत.
या बैठकीत पंतप्रधान मोदी राज्यांमधील कोरोनाची सद्यपरिस्थिती व 16 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या लसीकरण अभियानाची तयारी कुठपर्यंत आली आहे, याचा आढावा घेणार आहेत.