‘मन की बात’ प्रेरणेतून आकाश नाईक यांनी साकारली, जागतिक आयुर्वेद परिषदेत केली सुपुर्द
प्रतिनिधी/ फोंडा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ मधून साद घालीत देशभरातील युवकाना स्वप्ने दाखविली. त्यानंतर त्याच प्रेरणेने एका युवकाने आपल्या अंगी असलेल्या कलेच्या कंक्षा रूदावत जागतिक स्तरावर नावाजलेली कामागिरी केली. हे फलित आहे…. ‘मन की बात’चे. त्याची परतफेड म्हणून आपला आवडता नेता पंतप्रधान नरेद्र मोदीजीच्या गोव्यातील आगमनच्या स्वागतासाठी ‘त्या’ युवा कलाकाराने त्याची कायमस्वरूपी रांगोळी चित्ररूपी साकारून त्याना समस्त गोमंतकीयातर्फे स्वागत भेट दिली आहे. तो एखाद्या जादूगाराप्रमाणे फक्त कांडीऐवजी हातात रांगोळीचे रंग चित्रात उतरवून थ्रीडी, हायपर रिअलिस्टीक व चिरकाल टिकणारी रांगोळी साकारतो. आज गोमंतकीय त्याला ‘रंकाश’ फेम आकाश पुरूषोत्तम नाईक मु. पोस्ट गाळशिरे-कवळे, फोंडा म्हणून ओळखतात.
जागतिक आयुर्वेद कॉग्रेस परिषद आणि आरोग्य एक्स्पो 2022 च्या समारोप सोहळय़ात आकाश नाईक यांनी साकारलेली पंतप्रधान नरेद्र मोदी यांची कायमस्वरूपी टिकणारी चित्रकृती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुपुर्द केली. काल रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गोवा भेटीत त्याच्याकडे सुपुर्द करण्यात आली. मन की बात मधून थेट देशभरातील युवाईला साथ घालणारे पंतप्रधान मोदी यांची जादू देशभरात आहे. त्याचे ताजे उदाहरण म्हणजे रांगोळी कलाकार आकाश नाईक. आकाशने दोन महिन्यापुर्वी पंतप्रधान मोदीजींची हायपर रिएलीस्टीक रांगोळी बनविण्यासाठी सुरू केली होती. भविष्यात दिल्ली किंवा गोवा भेटीत ती पंतप्रधान मोदी यांना ती सुपुर्द करण्याचे स्वप्न मनी बाळगले होते. मात्र मोप विमानतळाच्या लोकार्पणासाठी पंतप्रधान गोव्यात दाखल झाल्यामुळे त्याची स्वप्नपुर्ती झाल्याचे बोल आकाश यांनी भेटीस्वरूप रांगोळी प्रतिकृती मोदी यांनी स्वीकारल्यानंतर व्यक्त केले.
चमच्यात मध ओतून साकारलेल्या रांगोळीचा विक्रम
एखाद्या जादूगाराप्रमाणे फक्त कांडीऐवजी हातात रांगोळीचे रंग चित्रात उतरवून थ्रीडी, हायपर रिअलिस्टीक रांगोळी आजपर्यंत आकाशने साकारलेल्या आहेत. चमच्यात मध ओतून त्याच साईबाबांची प्रतिकृती साकारलेली रांगोळी नाविन्यपुर्ण ठरली होती. सन 2021 साली एशिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये स्थान मिळाले होते. डोळे दिपून टाकणारी देवी शांतादुर्गेची रांगोळीला रसिकांकडून मिळालेला प्रतिसाद व देवीचा मिळालेल्या आशिर्वादानंतर तो एकाहून एक सरस रांगोळी साकारत सुटला आहे. (चिकटपट्टी गम व पिगमेंट कलरच्या सहाय्याने) चिरकाल टिकवून ठेवण्याचे तंत्र स्वतः आत्मसात केले आहे. भविष्यात याची नोंद एखादा विक्रमाशी होईल असा त्याचा विश्वास आहे. आकाश हा रांगोळी आर्टीस्ट असून सतत प्रयोगशील कलाकृती आपल्या रांगोळीतून साकारणारा तो अवलिया आहे. श्री साईबाबा, दामबाब यांची अप्रतिम अशी रांगोळी त्याने आजपर्यंत साकारलेल्य़ा आहेत. रंगाची धुळवण करीत त्याच्या रंकाश येथील शाळेत युवा कालाकारांना तो धडे देत आहे. एकाहून एक अशा सरस मनमोहक रांगोळी कलाकार त्याच्या हाताखाली तयार झालेले युवा कलाकार घडविणे हेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात मधून प्रेरणा त्याला देत आहे.