ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कार्यालय चक्क OLX वर विक्रीला ठेवण्यात आले होते. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. तसेच OLX वरील जाहिरात हटविण्यात आली आहे. वाराणसी पोलिसांनी यासंदर्भात एक व्हिडिओ शेअर केला आहे.
वाराणसी येथील भेलूपूर पोलीस ठाणे हद्दीतील जवाहर नगर परिसरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कार्यालय आहे. या कार्यालयाचा फोटो काढून चार संशयित आरोपींनी हे 7.5 कोटी रुपयांना olx वर विक्रीला ठेवले होते. ही जाहिरात पाहून वाराणसी पोलिसांनी तात्काळ ही जाहिरात हटवून चौघांना अटक केली. त्यांची चौकशी सुरू आहे.