ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ट्विटर फॉलोअर्सने आज नवा उच्चांक गाठला. मोदींचे मागील 10 महिन्यात 1 कोटी ट्विटर फॉलोअर्स वाढले असून, सध्या त्यांच्या ट्विटर फॉलोअर्सची संख्या 6 कोटींच्या पुढे गेली आहे.
पंतप्रधान मोदी 2009 सालापासून ट्विटर यूजर्स आहेत. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात त्यांच्या फॉलोअर्सची संख्या 5 कोटी होती. मागील 10 महिन्यात त्यांची लोकप्रियता चांगलीच वाढली आहे. जगातील टॉप टि्वटर फॉलोअर्स असलेल्या लोकांच्या यादीतही मोदी यांचे स्थान 15 वे आहे.
मोदींच्या फॉलोअर्सची संख्या 60 मिलिअनच्या पुढे म्हणजेच 6 कोटींहून अधिक आहे. तर मोदी स्वतः 2,354 लोकांना फॉलो करतात.