नवी दिल्ली/प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बदनामी करणाऱ्या एका व्हिडीओवरून उत्तर प्रदेश पोलिसांनी गूगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सुंदर पिचाई आणि अन्य १७ जणांविरुद्ध गेल्या आठवडय़ात गुन्हे नोंदविण्यात आलेल होते, मात्र आत सुंदर पिचाई यांचे नाव एफआयआरमधून काढून टाकण्यात आले असल्याची माहिती शुक्रवारी एका पोलीस अधिकाऱ्याने दिली.
या प्रकरणात पिचाई आणि अन्य तीन उच्चपदस्थ व्यक्तींचा सहभाग नसल्याचे आढळल्याने त्यांची नावे या एफआयआरमधून काढून टाकण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. पंतप्रधान मोदी यांची बदनामी करणाऱ्या व्हिडीओला हरकत घेतल्यानंतर आपल्या भ्रमणध्वनीवर ८,५०० हून अधिक धमक्यांचे फोन आले, अशी तक्रार एका स्थानिकाने केल्यानंतर एफआयआर नोंदविण्यात आला होता. दरम्यान या बाबत गूगलकडून अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही.