ऑनलाईन टीम / पाटणा :
देशात आजपासून कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. या टप्प्यात 60 वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. दुसऱ्या टप्प्यात लसीकरण सुरु होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी दिल्लीतील एम्स रुग्णालयात पहिली लस टोचून घेतली. पंतप्रधान मोदीं नंतर बिहार चे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी देखील लस टोचून घेतली आहे.
मिळालेल्या माहितनुसार, नितीश कुमार यांनी आयजीआयएमएस रुग्णालयात लस टोचून घेतली. त्यानंतर नितीश कुमार हे अर्धा तास डॉक्टरांच्या देखरेखीखाली राहिले. मुख्यमंत्र्यांसोबत दोन मंत्र्यांनी देखील लस टोचून घेतली आहे.
दरम्यान, बिहारमध्ये विधानसभा निवडणुकी दरम्यान राज्यातील सर्व नागरिकांना मोफत कोरोना लस देण्याचे आश्वासन नितीश सरकारने दिले होते. त्यानंतर देशभरात आजपासून सुरू झालेल्या कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात सर्व नागरिकांना राज्यात मोफत लस दिली जाणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी पार पडलेल्या बैठकीत करण्यात आली आहे.