नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सायंकाळी ४ वाजता महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह उपस्थित राहणार आहेत. दहशतवाद्यांनी प्रथमच ड्रोनचा वापर करून रविवारी पहाटे जम्मू विमानतळावरील भारतीय हवाई दलाच्या तळावर बॉम्बहल्ला केला. या स्फोटात हवाई दलाचे दोन अधिकारी जखमी झाले. या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलावली आहे.
या बैठकीचा नेमका अजेंडा काय असेल याची अद्याप कोणतीच माहिती समोर आलेली नाही. परंतु यात अनेक विषयांवर चर्चा होऊ शकते, अशी माहिती मिळाली आहे. देशाच्या सुरक्षेशी संबंधित अनेक बडे अधिकारीही या बैठकीत भाग घेतील. त्याचबरोबर जम्मू-काश्मीरमधील हवाई दलाच्या तळावर झालेल्या हल्ल्याबद्दलही चर्चा होऊ शकते.