एनईईटी, जेईई परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी
बेंगळूर/प्रतिनिधी
एनईईटी, जेईई परीक्षा घेण्याच्या केंद्राच्या निर्णयाचा अनेक स्तरातून विरोध होत आहे. यामध्ये कर्नाटक काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी पंतप्रधान मोदींना विद्यार्थ्यांप्रती अधिक संवेदनशील राहण्याचे आवाहन केले. तसेच नेट, जेईई परीक्षा पुढे ढकलण्याची मागणीही केली आहे.
यावेळी सिद्धरामय्या यांनी विद्यार्थ्यांसाठी प्रवास करणे सुरक्षित नाही, निवास व्यवस्था अवघड आहे, सार्वजनिक वाहतूक पूर्णपणे कार्यरत नाही, विद्यार्थ्यांही परीक्षा देण्यास उत्सुक नसतील अशी अपेक्षा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात न घालता परीक्षा पुढे ढकला असे त्यांनी म्हंटले आहे.
तसेच देशात कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढत आहे आणि तरीही विद्यार्थ्यांना धोका पत्करण्यास भाग पाडले जात आहे. त्यांनी परीक्षेसाठी आपला जीव द्यावा का? असे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या त्यांनी म्हंटले आहे.