ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटला भेट देणार आहे. सिरमच्या कोरोनावरील लसीचा आढावा घेतल्यानंतर ते देशातील लसीकरणासाठी पॅकेजची घोषणाही करण्याची शक्यता आहे. एका वृत्तवाहिनीने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
सिरम ही लस निर्मिती क्षेत्रातील जगातील अग्रगण्य कंपनी आहे. अमेरिकेतील ऑक्सफर्ड-अस्ट्राझेनेकाच्या कोरोनावरील लसीचे सिरम भारतात उत्पादन करत आहे. पंतप्रधान मोदी उद्या या लसीचा आढावा घेणार आहेत. तसेच देशातील लसीकरणाचा सर्व खर्च उचलण्याची मोदी बजेटमध्ये तरतूद करण्याचीही शक्यता आहे.
दरम्यान, उद्या 100 देशांचे राजदूतही सिरम इन्स्टिट्यूटला भेट देणार होते. मात्र, मोदींच्या दौऱ्यामुळे या तारखेत बदल करण्यात आला आहे. हे राजदूत 4 डिसेंबरलाभारतात येणार असल्याची माहिती पुण्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी दिली.