तरुण भारत ऑनलाइन टीम
महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरूच असतात .त्यात आता ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाची भर पडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या चित्रपटाची स्तुती केल्यानंतर आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी या मुद्द्यावरून केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान मोदी द काश्मीर फाइल्स या चित्रपटाचे प्रचारक असून, भाजपवाले राजकीय अजेंडा रावबत असल्याचं संजय यांनी म्हंटल आहे. ते दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. काश्मिरी पंडितांवर झालेले अत्याचार या चित्रपटात दाखवण्यात आले आहेत. मोठ्या संख्येने प्रेक्षक चित्रपटगृहात हजेरी लावत आहेत. अनेक बड्या चित्रपटांना टक्कर देत हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींचा गल्ला जमवत आहे. त्यातच भाजपच्या संसदीय बोर्डाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या चित्रपटावर भाष्य केले. यानंतर यावरून पुन्हा एकदा राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत.