बंगाली चित्रपटसृष्टीला धक्का ः दोघांची प्रियकराकडून फसवणूक
कोलकाता / वृत्तसंस्था
बंगाली मॉडेल मंजुषा नियोगी हिचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला आहे. मंजुषाचा मृतदेह पाटोली येथील घरात लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. सध्या पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. गेल्या 15 दिवसात बंगाली चित्रपटसृष्टीतील 3 अभिनेत्रींचा मृत्यू झाला आहे. मंजुषाची मैत्रिण आणि अभिनेत्री बिदिशा दे मजुमदार हिने आदल्या दिवशी आत्महत्या केली होती. 15 मे रोजी पल्लवी डे यांचा मृतदेह तिच्या फ्लॅटमध्ये सापडला होता. नवोदित मॉडेल्स आणि अभिनेत्रींच्या आत्महत्येच्या घटनेने बंगाली सिनेजगतात सर्वांनाच धक्का बसला आहे.
शुक्रवारी सकाळी मंजुषा खोलीतून बाहेर न आल्याने तिचे आई-वडील आपल्या मुलीला फोन करत होते. कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने मंजुषाचे पालक काळजीत पडले आणि त्यांनी मुलीच्या बेडरूममध्ये पाहिले असता मुलीचा मृतदेह फासावर लटकलेला होता. सध्या पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. मंजुषा नियोगी या व्यवसायाने मॉडेल आणि अभिनेत्री होत्या. मंजुषा नुकतीच कांची या टीव्ही शोमध्ये नर्सच्या भूमिकेत दिसली होती. यासोबतच त्याने अनेक शोमध्ये छोटय़ा भूमिकाही केल्या आहेत. तिची मैत्रिण बिदिशाच्या मृत्यूनंतर ती डिप्रेशनमध्ये होती, असे मंजुषाच्या आईने पोलिसांना सांगितले.
पल्लवी डे हिची आत्महत्या
पल्लवी डे हिचाही याच महिन्याच्या 12 तारखेला संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. अभिनेत्रीचा मृतदेह तिच्या फ्लॅटमध्ये लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. मात्र, काही दिवसांनी पल्लवीचा लिव्ह-इन-पार्टनर साग्निक चक्रवर्ती याला अटक करण्यात आली. अभिनेत्रीच्या कुटुंबियांनी हत्येचा आरोप केला आहे.