सातारा-फलटणमधील वाढीचे सत्र कायम
प्रतिनिधी/ सातारा
कोरोनाचा संसर्ग काही प्रमाणात कमी झालेला असतानाही जिल्हा प्रशासनाने रोजच्या चाचण्यांचे प्रमाण कमी केलेले नाही. रोज सरासरी 15 हजार चाचण्या केल्या जात असून 5 टक्क्यांच्या दरम्यान बाधितांचे प्रमाण आहे. यातही सातारा आणि फलटण तालुक्यांचा संसर्ग कमी झाल्यास रूग्णप्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. मात्र सातारा आणि फलटणमधील वाढीचे सत्र कायम आहे. गुरूवारी रात्रीच्या अहवालात 595 रूग्णांचे अहवाल बाधित आले असून 9 जणांचा मृत्यू झाला आहे. तर सायंकाळी 608 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, जिल्हय़ाच्या लोकसंख्येत 55 टक्क्यांपर्यंत लसीकरण करण्यात प्रशासन यशस्वी झाले आहे.
रूग्ण कमी तरीही चाचण्यांचे प्रमाण कायम
जिल्हय़ात दुसऱया लाटेचा वेग कमी झाला असला तरी सरासरी पाचशे रूग्ण रोज आढळून येत आहेत. या स्थितीत लवकर निदान होण्यासाठी प्रशासन चाचण्या वाढवण्यावर भर देत आहे. यामुळे आजाराचे लवकर निदान होऊन उपचार करण्यास मदत होत आहे. वाढत्या चाचण्या पाहता पॉझिटिव्हीटी रेट 5 टक्क्यांच्या आत येत असल्याचा दिलासा मिळत आहे.
सातारा-फलटणचे टेन्शन कायम
जिल्हय़ाचा हॉटस्पॉट असणाऱया सातारा तालुक्यात गेले दहा महिने प्रथम क्रमांकाची रूग्णसंख्या नोंद होत आहे. काही वेळा फलटण, कराड तालुके प्रथम क्रमांकावर गेले होते. मात्र सरासरी जादा रूग्ण सातारा तालुक्यातच नोंद होत आहेत. त्यामुळे सातारा व त्यापाठोपाठ फलटणमध्ये रूग्णवाढ रोखण्यासाठी ऍक्शन प्लॅनची गरज आहे. हे दोन तालुके नियंत्रणात आल्यास दुसऱया लाटेतून मुक्तता शक्य आहे.
साताऱयात 160 रूग्ण
जिह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 595 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे. या सर्वाधिक 160 रूग्ण सातारा तालुक्यात नोंद झाले असून फलटणमध्ये 128 रूग्णांची नोंद झाली आहे.
नऊ तालुके शंभराखाली
उर्वरित 9 तालुक्यांमध्ये रूग्णसंख्या शंभरखाली आहे. तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आजअखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे -जावली 13 (9791), कराड 42 (37606), खंडाळा 18 (13770), खटाव 70 (23980), कोरेगाव 72 (20822), माण 43 (16678), महाबळेश्वर 3 (4579), पाटण 16 (9909), फलटण 128 (34426), सातारा 160 (48924), वाई 22 (15288) व इतर 8 (1876) असे आजअखेर एकूण 237649 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
नऊ बाधितांचा मृत्यू
गेल्या चोवीस तासात 9 बाधितांचा मृत्यू झाला आहे. आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आजअखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे – जावली 1 (215), कराड 2 (1157), खंडाळा 1 (190), खटाव 1 (594), कोरेगाव 2 (454), माण 1 (376), महाबळेश्वर 0 (88), पाटण 0 (363), फलटण 1 (670), सातारा 0 (1435), वाई 0 (356) व इतर 0 (78), असे आजअखेर जिह्यामध्ये एकूण 5976 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
608 जणांना दिला डिस्चार्ज
जिह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या 608 जणांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
शुक्रवारी 26 हजार 201 जणांना लस जिल्हय़ात लस उपलब्ध झाल्याने लसीकरणाचा वेग वाढला आहे. शुकवारी 26 हजार 201 जणांना लसीचे डोस देण्यात आले. यामुळे आता लस घेणाऱया एकूण नागरिकांची संख्या 17 लाख 42 हजार 404 एवढी झाली आहे. यामध्ये पहिला डोस घेतलेल्याची संख्या 12 लाख 24 हजार 185 एवढी झाली असून दुसरा डोस घेणाऱयांची संख्या 5 लाख 19 हजार 129 एवढी दिलासादायक झाली आहे. मात्र, अद्याप लसीकरणाचा वेग वाढवण्याची गरज नागरिक व्यक्त करत आहेत.