ऑनलाईन टीम / श्रीनगर :
दक्षिण काश्मीरमधील पंपोरमध्ये दहशतवाद्यांनी CRPF पथकावर गोळीबार केला. या गोळीबारात 2 जवान शहीद झाले. तर तीन जवान जखमी झाले आहेत. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सीआरपीएफच्या रोड ओपनिंग पार्टीचे गस्ती पथक पंपोर महामार्गावर गस्त घालत होते. अचानक तिथे काही दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. या गोळीबारात पाच जवान जखमी झाले होते. त्यांना तात्काळ जवळच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान दोघांची प्राणज्योत मालवली.
सुरक्षा दलाच्या जवानांनी पंपोरमधील परिसराला घेराव घातला असून, शोध मोहीम सुरू आहे. दरम्यान, मागील आठवड्यात एलओसरीवर पाक सैन्याने केलेल्या गोळीबारात दोन जवान शहीद झाले होते.