प्रतिनिधी /बेळगाव
बेळगावचे पं. पी. व्ही. कडलास्करबुवा यांच्या जन्मशताब्दीनिमित्त दि. 18 जून रोजी सरस्वती वाचनालय येथे सायंकाळी 5 वाजता संगीतोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यावेळी अनिता पागाद, प्रभाकर शहापूरकर, मंजुश्री खोत व पं. गुरुराज कुलकर्णी यांचे गायन होणार आहे. त्यांना तबल्यावर विशाल मोडक व नारायण गणाचारी व संवादिनीवर वामन वागुकर व मुकुंद गोरे साथ करणार आहेत. कलाकारांचा परिचय पुढीलप्रमाणे-
अनिता पागाद या बीएसएनएलच्या निवृत्त अधिकारी असून संगीत अलंकार परीक्षा उत्तीर्ण आहेत. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या त्या मान्यताप्राप्त कलाकार आहेत. प्रभाकर शहापूरकर हे जॉन्सन ऍण्ड जॉन्सन या औषध कंपनीचे निवृत्त प्रतिनिधी असून पं. आर. एन. जोशीबुवांचे ज्ये÷ शिष्य आहेत. ते शास्त्रीय आणि भक्तीगीत गायक असून संगीत कलाकार संघाचे विद्यमान सेपेटरी आहेत.
मंजुश्री खोत या ज्ये÷ संगीत शिक्षिका आणि उत्कृष्ट गायिका असून कडलास्कर बुवा आणि नंदन हेर्लेकर यांच्या शिष्या आहेत. अनेकांना त्यांनी गायनात मार्गदर्शन केले आहे. गुरुराज कुलकर्णी हे सार्वजनिक बांधकाम खात्याचे निवृत्त अधिकारी असून संगीत विद्वत उत्तीर्ण आहेत. ते कडलास्कर बुवांचे ज्ये÷ शिष्य आणि शास्त्रीय भक्तीसंगीत गायनाचे कार्यक्रम करत असतात.