प्रतिनिधी /पणजी
दक्षिण गोव्यातील आरोसी समुद्रकिनाऱयावर कार भरवेगात चालवून काही पक्षांना मारल्याच्या आरोपावरुन वेर्णा पोलिसांनी मंगळवारी तेलंगण राज्यातील अज्ञात कार चालकाविरुद्ध तीन वेगवेगळय़ा कायद्याखाली गुन्हा नोंद केला आहे.
पर्यटन खात्याच्या उपसंचालकांनी या प्रकरणी वेर्णा पोलीस स्थानकात तक्रार केली आहे. या तक्रारीवर आधारुन वेर्णा पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या 188 कलमाखाली, मोटर वाहन कायद्याखाली तसेच प्रुएल्टी टू एनिमल ऍक्टच्या विविध कलमाखाली गुन्हा नोंद केला आहे.
प्राप्त माहितीनुसार जीवाचा गोवा करण्यासाठी तेलंगण राज्यातून टीएस-12-ईव्ही-3333 क्रमाकांची कार घेऊन गोव्यात आलेल्या पर्यटकानी मंगळवारी ही कार आरोसी समुद्रकिनाऱयावरील पाण्यात नेली. मऊ रेतीत कार भरधाव फिरवून या पर्यटकांनी आनंद लुटला. मात्र, हे करीत असताना तेथे असलेल्या काही पक्षांना मारुन टाकले.
घोव्यात येणाऱया प्रशासनाने पर्यटकाना काही मार्गदर्शक तत्वे घालून दिलेली आहेत. आणि त्यासंबंधीची सविस्तर माहिती राज्याच्या राजपत्रातही प्रसिद्ध केली होती. समुद्रकिनारी अनधिकृत वाहनांना बंदी असल्याचे सुचित करण्यात आले होते. मात्र, असे असूनही टीएस-12-ईव्ही-3333 क्रमाकांच्या कार चालकांनी सोमवारी आरोशी समुद्रकिनारी ही कार नेऊन मार्गदर्शक तत्वांचा भंग केला.
मंगळवारी सायंकाळी उशिरा वेर्णा पोलिसांकडे संपर्क साधला तेव्हा वरील क्रमांकाच्या कार चालकाविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या 188 कलमाखाली, मोटर वाहन कायद्याखाली तसेच प्रुएल्टी टू एनिमल ऍक्टच्या विविध कलमाखाली गुन्हा नोंद केला असल्याची माहिती दिली.