पक्षी उडत असताना किंवा कोणतीही कृती करत असताना समप्रकारच्या पक्षांबरोबरच मेंदूतील सिग्नल्सच्या माध्य़मातून संपर्क साधतात, हा शोध अनेक दशकांपूर्वीच लागला आहे. तथापि हे सिग्नल्स कशाप्रकारचे असतात आणि त्यातून कोणते संदेश वाहिले जातात. याविषयी आजवर कोणतीही कल्पना नव्हती. तथापि आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने पक्षांचे हे सिग्नल्स वाचण्यात यश आले आहे. त्यामुळे मूकबधीर लोकही या सिग्नल्सच्या माध्य़मातून संवाद साधू शकतील, अशी शक्यता निर्माण झाली आहे. आता वैज्ञानिक अशा प्रकारचे उपकरण तयार करण्याच्या प्रयत्नात आहेत. हे विशिष्ट प्रकारचेच पक्षी आहेत.
अमेरिकेतील सँड डियागो येथील कॅलिफोर्निया विद्यापीठात यावर संशोधन करण्यात आले. जेबरा नावाच्या चिमण्यांचे सिग्नल्स पकडण्यात आणि डिकोड करण्यात (वाचण्यात) संशोधकांना यश आले. त्यानंतर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने या सिग्नल्सचे डिकोडींग केल्यानंतर ही चिमणी पुढचे गाणे (सुरावर) कोणती म्हणणार आहे. याचे अचूक अनुमान काढता आले.
आता या पद्धतीचा अभ्यास करून उपकरण निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात आहे. हे उपकरण मूकबधीर माणसांनाही उपयोगी पडेल अशी अपेक्षा आहे. तसे झाल्यास मूकबधीरांचा एकमेकांत संपर्क साधण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.