ऑनलाईन टीम / हैदराबाद :
अंबाला एअरबेस परिसरात असलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे तेथे मोठ्या प्रमाणात पक्षी येतात. या पक्षांमुळे राफेल विमानांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला आहे.
फायटर विमानांच्या सुरक्षेसाठी छोट्या आणि मोठ्या पक्षांना एअरफिल्डपासून दूर ठेवणे आवश्यक आहे. एअरबेसवर मोठ्या प्रमाणात पक्षी येत असतात. एखाद्यावेळी त्यांची विमानासोबत धडक झाली तर मोठे नुकसान होऊ शकते.
त्यामुळे एअरबेस परिसरातील पक्षांचा वावर कमी करण्यासाठी एअर फिल्डच्या 10 किलोमीटरपर्यंतच्या परिसरात एअर फोर्सने सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट योजनेची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी अंबालाच्या अतिरिक्त महापालिका आयुक्तांकडे केली आहे.