प्रतिनिधी /म्हापसा
गोव्याचे माजी सभापती राजेंद्र आर्लेकर यांची हिमाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली. आपण त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले आहे. ते शिक्षक, आमदार, मंत्री तसेच सभापती झाले. आज त्यांना भाजपने मोठा रिवॉर्ड दिला आहे. त्यांचे लाईफ टाईम ऍचिव्हमेंट त्यांच्या पदरी पडले आहे. त्यांनी लहानपणापासून केलेल्या कार्याची ही पोचपावती आहे. एक कर्तबगार संघचालक म्हणून त्यांनी नावलौकीक मिळविला आहे, अशी प्रतिक्रिया कचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो यांनी व्यक्त केली.