ऑनलाईन टीम / चंदीगढ :
पठाणकोटच्या बामियाल सेक्टरमधील दिंडा पोस्टजवळ आज सकाळी 6 वाजून 10 मिनिटांनी पाकिस्तानी ड्रोनच्या संशयास्पद हालचाली आढळून आल्या. बीएसएफ जवानांच्या गोळीबारानंतर संशयित ड्रोन पाकिस्तानात पुन्हा गेला.
टेहाळणीसाठी अथवा कोणती शस्त्रे टाकण्यासाठी हा ड्रोन पठाणकोटच्या बाजूला पाठवण्यात आला होता का, याचा शोध बीएसएफचे जवान घेत आहेत.