प्रतिनिधी / बेळगाव
तिसऱया रेल्वेगेटजवळील एका पडक्मया घरात झोपेत असताना एकाचा मृत्यू झाला आहे. बुधवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला आहे. उद्यमबाग पोलीस स्थानकात यासंबंधी एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
नयनकुमार महादेव अनगोळकर (वय 56, रा. हिंदुनगर-टिळकवाडी) असे त्याचे नाव आहे. त्याचे मानसिक संतुलन बिघडले होते. तो नेहमी घराबाहेर फिरायचा. बुधवारी दुपारी तिसऱया रेल्वेगेटजवळील एका पडक्मया घरात झोपेत असताना त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस निरीक्षक दयानंद शेगुणशी पुढील तपास करीत आहेत.