सेन्सेक्स 33.20 तर निफ्टी 5 अंकांनी वधारला
वृत्तसंस्था /मुंबई
चालू आठवडय़ातील गुरुवारच्या सत्रात सुरुवातीच्या कालावधीत बाजारात तेजीचा कल राहिला होता, परंतु तो नफावसुलीच्या प्रभावात टिकवून ठेवण्यात बाजाराला यश आले नाही. अंतिमक्षणात सेन्सेक्स पडझडीत राहिल्याचे दिसून आले. यामध्ये काहीवेळ बीएसई सेन्सेक्स 897.77 अंकांनी वधारला होता. मात्र बाजार बंद होताना, मात्र 33.20 अंकांनी फक्त वधारुन 55,702.23 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 5.05 अंकांनी वधारत 16,682.65 वर बंद झाला आहे.
दिग्गज कंपन्यांमध्ये टेक महिंद्रा, इन्फोसिस, एचसीएल टेक, टाटा स्टील, विप्रो, आयटीसी, एचडीएफसी, टीसीएस, कोटक महिंद्रा बँक आणि आयसीआयसीआय बँक यांचे समभाग तेजीसह बंद झाले आहेत. दुसऱया बाजूला मात्र इंडसइंड बँक, सन फार्मा, नेस्ले, अल्ट्राटेक सिमेंट, रिलायन्स इंडस्ट्रीज, पॉवरग्रिड कॉर्प, बजाज फिनसर्व्ह आणि टायटन यांचे समभाग मात्र घसरणीसह बंद झाले आहेत.
जागतिक बाजारांमध्ये हाँगकाँगचा बाजार घसरणीसह बंद झाला आहे. यामध्ये शांघाय काहीशा वाढीसह बंद झाला, तर जपान आणि कोरियाचा बाजार सुट्टीमुळे बंद झाला होता. युरोप शेअर बाजार दुपारच्या सत्रापर्यंत वाढीसह कार्यरत राहिला होता.
अमेरिकन फेडरलने वाढविला व्याजदर
अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँकेने बुधवारी व्याजदर अर्ध्या टक्क्यांनी वाढवला आहे. वाढत्या महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी हा निर्णय बँकेने घेतला आहे. याचा परिणाम मात्र जगातील विविध देशांवर झाल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे.
आरबीआयचीही रेपोदरात वाढ
भारतीय रिझर्व्ह बँक(आरबीआय)यांनी चलनवाढ नियंत्रणात आणण्यासाठी रेपोदरात वाढ करुन तो 4.40 टक्के केला आहे. ज्याचा परिणाम म्हणून बुधवारी शेअर बाजारात मोठी घसरण राहिल्याचे दिसून आले.
समभाग वधारलेल्या कंपन्या
- टेक महिंद्रा……. 1263
- इन्फोसिस…….. 1585
- एचसीएल टेक… 1073
- विप्रो…………….. 501
- टाटा स्टील……. 1284
- कोटक महिंद्रा…. 1797
- टीसीएस………. 3513
- आयटीसी……….. 261
- आयसीआयसीआय 728
- एचडीएफसी….. 2214
- लार्सन ऍण्ड टुब्रो 1638
- महिंद्रा ऍण्ड महिंद्रा 898
- मारुती सुझुकी… 7405
- स्टेट बँक…………. 479
- सिमेन्स………… 2310
- हिरोमोटो……… 2502
- गेल………………. 161
- वेदान्ता………….. 405
- अशोक लेलँड……. 123
- मॅक्स फायनान्स.. 731
- ओएनजीसी…….. 164
समभाग घसरलेल्या कंपन्या
- इंडसइंड बँक……. 936
- नेस्ले………….. 17599
- अल्ट्राटेक सिमेंट. 6355
- सन फार्मा………. 877
- रिलायन्स इंडस्ट्रीज 2640
- पॉवरग्रिड कॉर्प…. 233
- बजाज फिनसर्व्ह 14136
- टायटन………… 2261
- एशियन पेन्ट्स.. 3076
- भारती एअरटेल… 717
- ऍक्सिस बँक…….. 702
- डॉ.रेड्डीज लॅब…. 3968
- बजाज फायनान्स 6311
- एनटीपीसी……… 158
- एचडीएफसी बँक 1352
- हिंदुस्थान युनि.. 2166
- ब्रिटानिया…….. 3277
- कोलगेट……….. 1570
- आयशर मोर्ट्स… 2432
- पीआय इंडस्ट्रीज 2724
- डाबर इंडिया….. 529